मराठी इंडियन आयडॉल फेम श्वेता दांडेकरचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shweta Dandekar
मराठी इंडियन आयडॉल फेम श्वेता दांडेकरचा सत्कार

मराठी इंडियन आयडॉल फेम श्वेता दांडेकरचा सत्कार

मुरूड : मराठी इंडियन आयडॉल स्पर्धेत उपविजेतेपद पटकावणाऱ्या श्वेता दांडेकर हिचा कोमसाप मुरूड शाखा तथा कलासागर नाट्य संस्थेमार्फत सत्कार करण्यात आला. मुरूड तालुक्यातील लक्ष्मीखार येथील मनीष माळी यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात जंजिऱ्याची प्रतिकृती भेट म्हणून देण्यात आली. मुरूडमधील अनेक कलाकार विविध सीरियल्स आणि गायन स्पर्धेत आघाडीवर आहेत.

त्यातून श्वेता दांडेकर हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून गायनात उंच भरारी घेतली. ही मुरूडकरांसाठी अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्‍गार कोमसाप शाखाध्यक्ष संजय गुंजाळ यांनी काढले. मुरूडकरांनी केलेला सन्मान हा अन्य नागरिकांनी केलेल्या सन्मानापेक्षा अधिक मोलाचा असल्याचे श्वेता म्हणाली. याप्रसंगी कोमसाप मुरूड कार्याध्यक्ष अरुण बागडे, मुरूड युवाशक्ती प्रमुख आशीष पाटील, सायली गुंजाळ, उमा बागडे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Md122b01393 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai NewsMumbai
go to top