
सावित्रीच्या लेकींसाठी भातपीक शेती शाळा
मुरूड, ता. २२ (बातमीदार) : तालुक्यातील जोसरांजण येथे महिला शेतकऱ्यांची भातपिकाची शेतीशाळा शनिवारी (ता. २१) माजी सभापती आशिका ठाकुर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. सावित्रीच्या लेकींनी दीप प्रज्वलन करून ४० महिला शेतकऱ्यांचे चार गट पाडले. मतपेटीद्वारे चाचणी घेण्यात आली. त्यानंतर लघु अभ्यास व भातपिकाची उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक आणि भातबियाण्याला मिठाच्या द्रावणाची, रासायनिक आणि जैविक बीजप्रक्रिया कशी करावी, याचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले. खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी, जमिनीची पूर्वमशागत, रोपवाटिका तयार करणे व त्यांची काळजी घेणे आदीविषयी कृषी सहायक मनीषा काळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच भातपीक विमा आणि १० टक्के खतांची बचत याविषयी कृषी सहायक मनोज कदम यांनी मार्गदर्शन केले. तसेच लघु अभ्यासात माती परीक्षणानुसार खत वापराबाबत मंडळ कृषी अधिकारी व्ही. डी. अहिरे यांनी विस्तृत माहिती दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Md122b01416 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..