फणसाड अभयारण्यातील वन्यजीव गणना पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फणसाड अभयारण्यातील वन्यजीव गणना पूर्ण
फणसाड अभयारण्यातील वन्यजीव गणना पूर्ण

फणसाड अभयारण्यातील वन्यजीव गणना पूर्ण

sakal_logo
By

मुरूड, ता. २३ (बातमीदार) : तालुक्यातील फणसाड अभयारण्यात बुद्धपौर्णिमेला वन्यजीव गणना करण्यास सुरुवात झाली. एका दिवसाच्या या चंद्रप्रकाशात सुरू असलेल्या गणनेत १३ मचाणावर जागता पहारा ठेवण्यात आला. या वेळी काही गाणींवर बिबट्याच्या पाऊलखुणाही आढळल्या आहेत. या वेळी पक्ष्यांचीही गणना करण्यात आली.
सुमारे ५४ चौरस किलोमीटर परिसरात फणसाड अभयारण्याची व्याप्ती आहे. समुद्रसपाटीपासून जवळ असणार्‍या या अभयारण्यात जगातील सर्वांत लांब असलेल्या वेली वर्गापैकी एक असलेली गारंबीची वेल आढळून येते. ९० प्रकारची फुलपाखरे येथे बागडताना दिसतात. फुलपाखरामध्ये ब्ल्यू मारगोन, मॅप, कॉमन नवाब अशा विशिष्ट्यपूर्ण जाती आढळून येतात.
याच फणसाड अभयारण्यातील वन्यजीवांची गणना बुद्ध पौर्णिमेला केली जाते. यासाठी सोमवारी बुद्ध पौर्णिमेला प्रशासनाने तीन परिमंडळामध्ये १३ मचाण बांधून वन्यजीव गणनेस सुरुवात केली. या गणनेसाठी वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, तसेच ग्रीन वर्क ट्रस्ट व ऑऊल फाउंडेशन, तसेच मानद वन्यजीव सदस्य यांच्या मदत झाली. चंद्र प्रकाशात ही गणना एका दिवसाची करण्यात आली आहे. १३ मचाणावर जागता पहारा ठेवण्यात आला होता. पाणी स्रोत असणाऱ्या ठिकाणी गणना करताना भेकर, रानडुकर, ससा, रानमांजर, रानगवा, शेकरू, सांबर, खवल्या मांजर आदी वन्य प्राणी आढळून आले. त्यांची गणना करण्यात आली. तसेच काही गाणींवर (पाणथळ) बिबट्याच्या पाऊलखुणाही आढळल्या आहेत. खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर बिबट्यांचे अस्तित्व आढळून आल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. तसेच पक्ष्यांचे दर्शन झाल्याने त्यांचीही गणना करण्यात आली. यात मोर, ब्राह्मण घार, फ्रॉग बर्ड हॉर्न बेल, रातवा, ब्लॅक दरांगो आदी पक्षी आढळून आले आहेत.

----------------------------
वन्यजीव गणना एका दिवसाची असते. या दरम्यान झालेली गणना म्हणजे तेवढेच वन्यजीव समजण्यात येऊ नये. हे वन्यजीव त्या दिवसात आढळून आलेले आहेत. फणसाड अभयारण्यात वन्यजीवांची खूप मोठी संख्या आहे. हे क्षेत्र खूप मोठे असून सर्व वन्यजीव विखुरलेले आहे.
- राजवर्धन भोसले, वनपरिक्षेत्र अधिकारी, फणसाड अभयारण्य

Web Title: Todays Latest Marathi News Md122b01418 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..