संजय गांधी निराधार योजनांतर्गत ३२ प्रकरणे मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संजय गांधी निराधार योजनांतर्गत ३२ प्रकरणे मंजूर
संजय गांधी निराधार योजनांतर्गत ३२ प्रकरणे मंजूर

संजय गांधी निराधार योजनांतर्गत ३२ प्रकरणे मंजूर

sakal_logo
By

मुरूड, ता. २ (बातमीदार) : मुरूड तहसीलदार कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेंतर्गत भरत बेलोसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत ३२ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. या वेळी मुरूड तहसीलदार रोहन शिंदे, नायब तहसीलदार गोविंद कोटंबे, पंचायत समिती विस्तार अधिकारी सुभाष वाणी, नगर परिषद कार्यालय अधीक्षक परेश कुंभार, संजय गांधी निराधार अधिकारी रिमा कदम, विजय पैर, अल्ताफ खतीब, संतोष राणे, योगेंद्र गोयजी उपस्थित होते. संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये १८ विवाहित, दोन अविवाहित अपंग चार, घटस्फोटीत एक, श्रावण बाळ योजना सात, इंदिरा गांधी योजना (विधवा वयोगट ४० ते ६४) अशी एकूण ३२ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. ज्यांची प्रकरणे मंजूर झालीत, त्या लाभार्थींनी तहसील कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन मुरूड तहसीलदार रोहन शिंदे यांनी या वेळी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Md122b01427 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top