आपत्ती निवारणासाठी यंत्रणा सुसज्ज ठेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आपत्ती निवारणासाठी यंत्रणा सुसज्ज ठेवा
आपत्ती निवारणासाठी यंत्रणा सुसज्ज ठेवा

आपत्ती निवारणासाठी यंत्रणा सुसज्ज ठेवा

sakal_logo
By

मुरूड, ता. ७ (बातमीदार) : संभाव्य पूर, वादळ, वीज कोसळणे, अतिवृष्टी यांसह विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींशी मुकाबला करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आणि विविध विभागातील प्रशासन यंत्रणांनी सज्ज राहावे, असे आवाहन मुरूड तहसीलदार रोहन शिंदे यांनी केले.
मुरूड तहसीलदार कार्यालयात झालेल्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन बैठकीत ते बोलत होते. आपत्ती निवारणासाठी आवश्यक असलेली साधनसामुग्री, तसेच यंत्रणेचा आढावा आपत्ती व्यवस्थापन आराखड्याद्वारे घेण्याची सूचना त्यांनी केली. जीवित, वित्त आणि पर्यावरण रक्षण करणे, आपत्तींविषयी जनजागृती करणे, आपद्ग्रस्तांचा शोध घेऊन त्यांना मदत करणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे, नियंत्रण कक्षाद्वारे आपत्तीवर देखरेख ठेवणे, आपत्ती निवारणाचे नियोजन करणे यावर त्यांनी विस्तृत माहिती दिली. या वेळी पोलिस निरीक्षक नितीन गवारे, नायब तहसीलदार गोविंद कोटंबे, गटविकास अधिकारी सुभाष वाणी, नगरपरिषद लिपिक मनोज पुलेकर, राजपुरीचे सहायक बंदर निरीक्षक यशोधन कुलकर्णी, बांधकाम उप अभियंता आर. आर. गोरे, भारतीय तटरक्षक दलाचे अधिकारी अमोल शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित मेटे, मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी अ. का. कदम, एसटी आगार व्यवस्थापक सनील वाकचौरे, बोर्लीमांडला सहायक बंदर निरीक्षक देवदास पोटे, वन विभाग अधिकारी ए. एस. सहारे उपस्थित होते. आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष २४ तास सुरू राहणार असून, नागरिकांनी मदतीसाठी तहसीलदार ०२१४४२७०२६, नगर परिषद ०२१४४२७४०२२, पोलिस ठाणे ०२१४४२७४०३३ , रेवदंडा पोलिस ठाणे ०२१४१२४००३३ येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Md122b01429 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top