अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेजतर्फे शिवराज्याभिषेक दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेजतर्फे शिवराज्याभिषेक दिन
अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेजतर्फे शिवराज्याभिषेक दिन

अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेजतर्फे शिवराज्याभिषेक दिन

sakal_logo
By

मुरुड, ता. ६ (बातमीदार) ः शिवराज्याभिषेक दिन उच्च शिक्षण विभागातर्फे शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्सतर्फे विविध स्‍पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये निबंध, वक्तृत्व व भित्तीचित्र स्पर्धेचा समावेश आहे. ही स्‍पर्धा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना, डी.एल.एल.र्इ., ग्रंथालय व अंतर्गत गुणवत्ता हमी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साजिद शेख यांच्या मार्गदर्शनखाली करण्यात येत आहे. दरम्‍यान, महाविद्यालयाच्या सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रफीत दाखवण्यात आली.

मुरूड नगर परिषदेकडून महाराजांना अभिवादन
मुरूड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मुरूड नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे, रहीम कबले यांच्या हस्ते पुष्‍पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच शिवज्योत रॅलीचे आयोजनही करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Md122b01432 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top