छोट्या मासळीवर मच्छीमारांची गुजराण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छोट्या मासळीवर मच्छीमारांची गुजराण
छोट्या मासळीवर मच्छीमारांची गुजराण

छोट्या मासळीवर मच्छीमारांची गुजराण

sakal_logo
By

छोट्या मासळीवर मच्छीमारांची गुजराण
कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी खाडीकिनारी धाव

मेघराज जाधव : सकाळ वृत्तसेवा
मुरूड, ता. १२ (बातमीदार) : मत्स्य विभागाच्या या आदेशाचे पालन करत मच्छीमार खोल समुद्रात मासेमारीसाठी जात नाहीत; परंतु कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी खाडीलगत मचव्याच्या साह्याने लहान मासळींवर आपली गुजराण
करत आहेत.
किनारपट्टीवरील मच्छीमारांना मत्स्य विभागाकडून मासेमारीवर १ जून ते ३१ जुलै या काळात दरवर्षी बंदी घालण्यात येते. कारण या काळात समुद्र खवळळेला असतो. महत्त्वाचे म्हणजे मत्स्यबीजाची पैदास याच काळात होत असते. सध्या माशांचा प्रजनन काळ असल्याने खोल समुद्रात मासेमारीवर बंदी आहे. या बंदी काळात खवय्यांना मोठ्या मासळीऐवजी लहान मासळीवरच समाधान मानावे लागते वा सुक्या मासळीकडे मोर्चा वळवावा लागतो. सुकट, सोडे, सुके बोंबील यांनाही मोठी मागणी असते. मुरूड हे पर्यटन केंद्र असल्याने पर्यटकांची पसंती मिळेल ती ताजी मासळी खरेदी करण्याकडे त्यांचा कल असतो. जास्तीची मागणी व अपुरा पुरवठा त्यामुळे चढ्या किमतीत मासळी खरेदी करणे भाग पडते. परिणामी, स्थानिक ग्राहकांच्या खिशाला चाट पडते.या दरम्यान मच्छीमार दोन महिने खाडीकडे तळ ठोकून असतात. मासळी पकडण्यासाठी हात घोलवा, मोठा पेटा, पगावली, पेरा या साधनांचा वापर केला जाते. त्यामध्ये कोळंबी, मोठा बाईट, खरकडा, ढोमी, टोळ मासा, शिंगट्या मुशीचा घास आदी मासळी सापडत आहेत. याशिवाय पावसाळी जवळा, बोंबील, अंबाडी, कोळंबी, चिंबोरे आदी मासळीही मिळते.
सध्या महिला हातात खरेल (कोयती) घेऊन खडकावरील शिवल्या, कालवे फोडून विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण सर्वाधिक असते महिला घरोघरी जाऊनही विक्री करतात. सद्यस्थितीत खाडीलगत बागायतीची धूप होत असल्याने खाडीची रुंदी वाढली आहे. परिणामी, समुद्राच्या उधाणाचे पाणी खाडीत घुसत असल्याने भरतीच्या वेळेला अधिक मासे मिळतात. त्यामुळे कोळी बांधव वारा, पावसाची तमा न बाळगता खाडीत मासेमारी करतात.
मुरूड तालुक्यातील आगरदांडा, राजपुरी, एकदरा, मुरूड कोळीवाडा, नांदगाव, बोर्ली, कोर्लई, साळाव या गावांत पावसाळी पेरा वा छोट्या वल्ह्याने बारीक मासळी पकडून उदरनिर्वाह करत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मासेमारी बंदीच्या काळात जाळ्यांची दुरुस्ती, होड्यांची डागडुजी, रंगरंगोटी तसेच इंजिनची कामे करण्यात कोळीराजा
व्यग्र दिसतो.

मासळीचे दर (रुपयांत)
लहान कोळंबी ...१५० ते १६० नग .. २५० वाटा
मोठी कोळंबी - ३५ ते ४० नग ... ५०० ते ५५०
लहान मोठे बोयटे - ५ ते ६ नग ... ३०० ते ३५०

सुक्या मासळीचे दर (रुपयांत)
बारीक सुकट ... ३०० किलो
जाडी सुकट .... ५०० किलो
बारीक बोंबिल .... ४०० किलो
मोठे बोंबिल ... ५५० किलो
सोडे ... १८०० ते २००० किलो

---------------
कोल्हापूर, पुणे, पश्‍चिम महाराष्ट्रातील पर्यटक मुरूड मार्केटमधून सुकट, सोडे व सुके बोंबिलची खरेदी मोठ्या प्रमाणात करतात.
- मंगला अशोक नांदगावकर, मासळी विक्रेती

Web Title: Todays Latest Marathi News Md122b01440 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top