
युवा शक्ती ही देशाची खरी शक्ती ः अमित ठाकरे
युवा शक्ती ही देशाची खरी शक्ती ः अमित ठाकरे
मुरुड, ता. १० (बातमीदार) ः युवा शक्ती ही देशाची खरी शक्ती असून युवा पिढीला संघटीत करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी केले. संपूर्ण महाराष्ट्रात मनविसे बळकट करण्याच्या उद्देशाने त्यांनी दौरा सुरू केला आहे. याच हेतून ते मुरुड येथे आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी मनसे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील व मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.
अमित ठाकरे पुढे म्हणाले की, विद्यापिठांतर्गत सिनेट सदस्यांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळकोकणापासून विद्यार्थी सेनेच्या पुर्नबांधणीचे काम सुरू आहे. याला युवकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संजीवनी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाविषयी विचारले असता हा आर्श्चयजनक बदल असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, एकाच वेळी ४० आमदारांचा गट जे वक्तव्य करीत आहे त्यात सत्यता असली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
येथील पद्मदुर्ग किल्ल्याची पुरातत्व विभागाकडून देखभाल ठेवली जात नाही. पर्यटकांना येथे जाण्यास सुविधा नाहीत, याकडे अमित ठाकरेंचे लक्ष वेधण्यात आले. तेव्हा मनसे प्रमुख राज ठाकरे यांना महाराष्ट्रातील गड - किल्ल्यांविषयी विलक्षण आवड आहे. त्यांच्याशी आपण चर्चा करून संबधित खात्यांशी संपर्क करू. संवर्धनासाठी निश्चितपणाने प्रयत्न करू. तसेच, लाखो पर्यटकांना पद्मदुर्ग किल्यात जाणे शक्य होईल अशी व्यवस्था करू असा असे आश्वासन त्यांनी दिले.
Web Title: Todays Latest Marathi News Md122b01478 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..