पर्यटननगरीच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटननगरीच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध
पर्यटननगरीच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध

पर्यटननगरीच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध

sakal_logo
By

मुरूड, ता. २४ (बातमीदार) : मुरूडकरांनी दिलेले प्रेम आणि पाठिंबा हे शब्दतित आहे. त्याची उतराई म्हणून या पर्यटन नगराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटीबद्ध आहोत. तथापि, शहरालगतच्या भागाचा हवा तसा विकास झालेला नाही. त्या अविकसित भागाचाही प्राधान्याने विकास करणार असल्याचे प्रतिपादन शिंदे सरकारमधील आमदार महेंद्र दळवी यांनी केले.
मुरूड नगर परिषद कार्यक्षेत्रातील विकास कामांच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. आमदार दळवी मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, आतापर्यंत मुरूडला ५५ कोटींचा निधी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मिळवून दिला आहे. सरकार आपले असल्यामुळे आगामी काळातही निधीची कमतरता भासणार नाही, असा शब्द दिला. विकासकामांची गुणवत्ता उत्तम राखली जावी. कोणीही कामाविषयी आक्षेप घ्यायला नको, यासाठी प्रशासक प्रशांत भुसे यांना निर्देश दिले.
आमदार दळवी यांच्या हस्ते भोगेश्वर पाखाडी रस्ता, दत्त मंदिर सुशोभीकरण, सिद्दी मोहल्ला, लक्ष्मी खार अंतर्गत रस्ते, कुंभार वाडा उद्यान, शेगवाडा नाला, कोळीवाडा बोट क्लब शौचालय आदी सहा कोटींच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील, उपनगराध्यक्षा नौशिन दरोगे, माजी नगरसेवक अशोक धुमाळ, दत्त देवस्थान कमिटी अध्यक्ष प्रमोद भायदे, विश्वस्त आदेश दांडेकर, तालुका शिवसेना प्रमुख रुषीकांत डोंगरीकर, (शिंदे गट) मनोज कमाने, माजी नगरसेवक विजय पाटील, विलास सुर्वे, भरत बेलोसे, शुभांगी करडे उपस्थित होते.

दिघे यांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लागणार?
मंत्रिमंडळाचा विस्तार; तसेच न्यायालयीन निवाडा पूर्ण होताच एक महिन्याच्या आत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुरूड भेट घडवून आणणार असल्याची माहिती दळवी यांनी दिली. या भेटीनंतर दिवंगत आनंद दिघे यांचे भव्य स्मारक व दोन दशकांपासून रखडलेल्या तालुका क्रीडांगणाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Md122b01492 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..