दारूबंदीसाठी बेलीवाडीतील महिला एकवटल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दारूबंदीसाठी बेलीवाडीतील महिला एकवटल्या
दारूबंदीसाठी बेलीवाडीतील महिला एकवटल्या

दारूबंदीसाठी बेलीवाडीतील महिला एकवटल्या

sakal_logo
By

मुरूड, ता. १ (बातमीदार) : उसरोली ग्रामपंचायतीतील बेलीवाडी आदिवासीवाडीवर गावठी दारूचा धंदा खूप तेजीत आहे. या धंद्याचा हकनाक त्रास येथील महिलांना सहन करावा लागत आहे. घरातील कर्ता पुरुष दारूच्या अधीन गेल्याने संसार कोलमडून पडत आहे. हे थांबवण्यासाठी बेलीवाडी महिलांनी मुरूड तहसीलदारांना दारूसंबंधित धंदे बंद करण्याचे निवेदन दिले आहे.
गावठी दारू विकण्यावर बंदी असतानाही बेलीवाडी परिसरात हा धंदा जोरदार सुरू आहे. यामुळे पुरुषांसह वयात आलेली मुले दारूच्या व्यसनात गुंतली आहेत. दारू पिऊन ते घरच्या मंडळींना मारझोड करत असतात. व्यसनापायी कामधंदा टाळतात. याचा संपूर्ण त्रास परिवाराला सहन करावा लागत आहे. दारू पिण्यासाठी घरातील भांडी विकणे, धान्य विकणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. त्यामुळे आदिवासी महिलांचे जिने कठीण झाले आहे. मुरूड तहसीलदारांनी निर्णायक भूमिका घेऊन या भागात सुरू असलेले दारूचे धंदे तत्काळ बंद करण्यात यावी, अशी विनंती बेलीवाडी परिसरात राहणाऱ्या आदिवासी महिलांनी तहसीलदार रोहन शिंदे यांना केली आहे. निवेदन देतेप्रसंगी अदाड गावचे शाखाप्रमुख नितेश पाटील, उपशाखा प्रमुख अभि पाटील उपस्थित होते.


मुरूड पोलिस कार्यालयाला याबाबत पत्र देण्यात आले आहे. गावठी दारूचे धंदे कुठे सुरू आहेत, ते तपासून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
- रोहन शिंदे, तहसीलदार, मुरूड

Web Title: Todays Latest Marathi News Md122b01500 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..