
मुरूडमध्ये विजेचा शॉक लागून म्हैस दगावली
मुरूड, ता. ४ (बातमीदार) : मुख्य विद्युत वाहिनीची तार अंगावर पडल्याने म्हैस जागीच दगावल्याची घटना मुरूडमध्ये बुधवारी (ता. ३) घडली. मुरूड शहरातील पोलिस ठाण्यालगत राहणारे खालिद ऐनुल्ला यांची म्हैस कोटेश्वरी मंदिराच्या मागे चरावयास गेली होती. त्याच वेळी मुख्य विद्युत वाहिनीची एक तार अंगावर पडल्याने शॉक लागून म्हैस ठार झाली. दुभती म्हैस मेल्याने कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन गेले. तरी याबाबत नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ऐनुल्ला यांनी वितरण कंपनीकडे केली आहे. घटनेनंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत वाहिनीची दुरुस्ती केली आहे. शवविच्छेदनासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले असून, त्याचा अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. मुरूड महावितरणचे उपमुख्य कार्यकारी महादेव दातीर यांनी सांगितले की, भरपाई मिळण्यासाठी शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यात येईल. त्यानंतर त्यांना भरपाई मिळेल.
Web Title: Todays Latest Marathi News Md122b01507 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..