डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही
डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही

डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही

sakal_logo
By

डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही
आमदार महेंद्र दळवी यांनी बौद्ध समाज सेवा संघाला दिला विश्वास

मुरूड, ता. २९ (बातमीदार) ः मुरूड या ऐतिहासिक नगरीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी ५ कोटींची तरतूद झालेली आहे. या स्मारकासाठी आणखी ५ कोटींचा निधी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नरत राहू, असे आश्वासन आमदार महेंद्र दळवी यांनी दिले. मुरूड तालुका बौद्धसमाज सेवा संघ व केंद्रीय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मुरूड माळी समाज सभागृहात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक वचनपूर्ती सोहळ्यात ते बोलत होते.
दळवी पुढे म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुखांना सत्तेवरून उतरविणे हे दुर्भाग्य आहे; परंतु महाआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसने गैरफायदा घेत सेनेला गाफिल ठेवले. खरी सत्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितली, तर समाजातला शेवटचा घटकदेखील आमच्या पाठीशी राहील, असे भाष्य केले.
याप्रसंगी व्यासपीठावर आमदार महेंद्र दळवी, आरपीआयचे कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीश गायकवाड, मुख्याधिकारी पंकज भुसे, माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील, केंद्रीय समिती अध्यक्ष किशोर शिंदे, स्मारक समिती अध्यक्ष मनोहर तांबे, सचिव मंगेश येलवे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी जगदीश गायकवाड यांनी, आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नांतून स्मारक उभारणीसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल बौद्ध समाज कृतज्ञ असल्याचे सांगून आमदारांच्या मागे संपूर्ण ताकदीनिशी उभे राहू, असे आश्वासन दिले.
प्रास्ताविकात मंगेश येलवे यांनी, जिल्हा परिषद अध्यक्षा कविता गायकवाड यांच्या कार्यकाळात २०१३ पासून स्मारकाच्या विषयाला चालना मिळाल्याचे सांगून या ऐतिहासिक स्मारकात सर्व समाजाच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविले जाणार असल्याने सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात किशोर शिंदे म्हणाले की, ४५ वर्षे डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाचा विषय प्रलंबित होता. अनेक आमदार, खासदारांनी आश्वासनाव्यतिरिक्त काही दिले नाही. मात्र आमदार दळवी यांनी आमच्या भावनांचा आदर करीत दोन वर्षात स्मारकाचा प्रश्न मार्गी लावला. त्यांचे जाहीर आभार व्यक्त करीत मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्या सकारात्मक भूमिकेला दाद दिली. या कृतज्ञ सोहळ्यासाठी मुरुड तालुक्यातून अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोबत - फोटो
कृपया रायगड टुडे वर पहावा

Web Title: Todays Latest Marathi News Md122b01545 Txt Raigad Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..