बंदीकाळात मच्छीमार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बंदीकाळात मच्छीमार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा
बंदीकाळात मच्छीमार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा

बंदीकाळात मच्छीमार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा

sakal_logo
By

मुरूड, ता. १५ (बातमीदार) : तालुक्यातील राजपुरी बंदरात जून महिन्यात मासेमारीबंदी कालावधी असूनही सरकारचा आदेश न जुमानता काही नाखवांनी मासेमारी केली होती. या मच्छीमारांवर कारवाई करण्यात यावी. योग्य कारवाई न झाल्यास मुरूड तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा हरिदास बाणकोटकर यांनी दिला आहे.
मुरूड तालुक्यातील राजपुरी बंदरात मत्स्यबंदी काळात मासेमारी सुरू असल्याची माहिती बाणकोटकर यांनी मुरूडचे मत्स्यविकास व परवाना अधिकारी तुषार वाळुंज यांना दिली होती. तसेच, घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देण्याची विनंती केली; परंतु आपण कार्यक्षेत्राच्या बाहेर आहोत, असे सांगून संबंधित बोटमालकांवर कार्यवाही करण्यास टाळाटाळ केली, अशी तक्रार निवेदनाद्वारे रायगड जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, अलिबाग सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय अधिकारी, मुरूड तहसीलदार व पोलीस ठाणे यांच्याकडे करण्यात आली आहे. मच्छीमारी करतानाचे चित्रीकरण केले असून ते सूक्ष्मरित्या तपासून पाहण्यात यावे आणि बोटमालकांवर मत्स्य विभागाच्या शासकीय अध्यादेशाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी बाणकोटकर यांनी केली आहे. अर्जाची चौकशी करताना तक्रारदारांना प्रत्यक्ष न बोलावणे व एकतर्फी अहवाल तयार करणारे मुरूडच्या मत्स्यव्यवसाय व परवाना अधिकारी तुषार वाळुंज यांना निलंबित करण्यात यावेत. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अधिकारी नेमावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे केली आहे. यावर कारवाई न केल्यास मुरूड तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा हरिदास बाणकोटकर यांनी कुटुंबासमवेत दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Md122b01569 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..