मुरूडमध्ये ठाकरे युवासेना रस्तावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुरूडमध्ये ठाकरे युवासेना रस्तावर
मुरूडमध्ये ठाकरे युवासेना रस्तावर

मुरूडमध्ये ठाकरे युवासेना रस्तावर

sakal_logo
By

मुरूड, ता. १५ (बातमीदार) ः वेदांत कंपनीचा प्रकल्प गुजरातला पळवून नेल्याबद्दल शिंदे व फडणवीस सरकारांचा निषेध करण्यासाठी मुरूड शहरातील बाजारपेठेत ठाकरे युवासेनेने रस्तावर उतरून खोके सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्‍यानंतर मुरूड तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले. राज्य व केंद्र सरकारच्या निषेधासाठी स्वाक्षरी मोहीम राबवून प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मुरूड शिवसेना तालुका प्रमुख नौशाद दळवी, युवा शहर अधिकारी प्रतीक उमरोटकर, माजी पंचायत समिती उपसभापती चंद्रकांत मोहिते, योगेश सुर्वे, माजी नगरसेविका मुग्धा जोशी आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Md122b01572 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..