ओंकार विद्या मंदिरात भोंडल्‍याचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओंकार विद्या मंदिरात भोंडल्‍याचे आयोजन
ओंकार विद्या मंदिरात भोंडल्‍याचे आयोजन

ओंकार विद्या मंदिरात भोंडल्‍याचे आयोजन

sakal_logo
By

ओंकार विद्या मंदिरात भोंडल्‍याचे आयोजन
मुरूड, ता. ३ (बातमीदार) ः अध्यापनासोबतच  सांस्कृतिक वारसा जपणे व तो विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे या उद्देशाने हिंदू एज्युकेशन सोसायटी संचलित ओंकार बालवाडी व विद्या मंदिरात भोंडल्याचे आयोजन करण्यात आले होते. हस्त नक्षत्रात सूर्याने प्रवेश केला की दुसऱ्या दिवशी हादगा म्हणजे भोंडला सुरू होतो. भोंडल्याला भुलाबाई असेही नाव आहे. हत्तीचे चित्र मध्यभागी ठेवून त्याभोवती तरुण मुली, स्‍त्रिया फेर धरून गाणी गातात. समृद्धीचे प्रतीक असलेल्‍या हत्तीच्या प्रतिमेची पूजा केली जाते. हल्‍ली ताणतणावातून मुक्त होण्यासाठी व आनंद प्राप्तीसाठी अनेक सार्वजनिक ठिकाणी भोंडला साजरा केला जातो. अशा पारंपरिक उत्सवातून सांस्कृतिक वारसा जपला जात असल्‍याचा विश्‍वास ओंकार विद्या मंदिराच्या अध्यक्षा दीपाली जोशी व्यक्त केला. कार्यक्रमासाठी संस्थेचे विश्वस्त, शिक्षिका व पालक वर्ग उपस्थित होते.