मुरूडमध्ये महिला-मुलींना आरोग्‍याबाबत मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुरूडमध्ये महिला-मुलींना आरोग्‍याबाबत मार्गदर्शन
मुरूडमध्ये महिला-मुलींना आरोग्‍याबाबत मार्गदर्शन

मुरूडमध्ये महिला-मुलींना आरोग्‍याबाबत मार्गदर्शन

sakal_logo
By

मुरूड ( बातमीदार) ः दिघीतील आरोग्य उपकेंद्रात किशोरवयीन मुली व महिला यांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आंतरराष्‍ट्रीय बालिका दिनाचे औचित्‍य साधून नुकतीच अदाणी फाउंडेशनच्या जयश्री काळे यांनी मुली-महिलांचे शिक्षण, आरोग्‍य, पोषण आहाराबाबत माहिती दिली. शिवाय आगामी काळात त्‍यासाठी विविध उपक्रम राबविणार असल्‍याचेही सांगितले. यावेळी आरोग्य सेविका मंगल पाबरेकर यांनी किशोरवयीन मुलींना मासिक पाळीदरम्‍यान येणाऱ्या समस्‍या, उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. ग्रामसखी अर्चना कासारे आणि वैभवी मेंदाडकर यांनी आरोग्य विषयक सवयी व स्वयं स्वच्छतेची जाणीव करून दिली. यावेळी बायोमास चुलीचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. तसेच मुली व महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.

मुरूड ः