मुरूडमध्ये ठाकरे गटाचा मशाल मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुरूडमध्ये ठाकरे गटाचा मशाल मोर्चा
मुरूडमध्ये ठाकरे गटाचा मशाल मोर्चा

मुरूडमध्ये ठाकरे गटाचा मशाल मोर्चा

sakal_logo
By

मुरूड, ता. १६ (बातमीदार) : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे शनिवारी (ता. १५) मुरूड शहरात मोठा मशाल मोर्चा काढण्यात आला. निवडणूक आयोगाने दिलेले मशाल चिन्ह हे नागरिकांना ज्ञात व्हावे आणि जनजागृती व्हावी, यासाठी शिवसैनिकांनी मुरूड नगरपरिषदेत शिवछत्रपती महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर जळत्या मशालीसह मोर्चा शहरातील मुख्य मार्गावरून घोषणा देत काढला. या वेळी उद्धवसाहेब आगे बढो। हम तुम्हारे साथ है । जय भवानी, जय शिवाजी, ५० खोके एकदम ओके आदी घोषणांनी शहर दणाणून सोडले. कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. या वेळी मुरूड तालुकाप्रमुख नौशाद दळवी, ज्येष्ठ नगरसेवक प्रमोद भायदे, विजय वाणी, कुणाण सतविडकर, प्रशांत कासेकर, माजी उपसभापती चंद्रकांत मोहिते, अशील ठाकूर, दीपाली जामकर उपस्थित होते.