मोबाईल चोरास मुरूड पोलिसांकडून अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोबाईल चोरास मुरूड पोलिसांकडून अटक
मोबाईल चोरास मुरूड पोलिसांकडून अटक

मोबाईल चोरास मुरूड पोलिसांकडून अटक

sakal_logo
By

मुरूड, ता. १९ (बातमीदार) : रायगड जिल्ह्यातील अलिकडील मोबाईल चोरीच्या घटना वाढत आहेत. अलिबाग स्थानिक गुन्हे अन्वेषण खात्याला सराईत मोबाईल व अन्य इलेक्ट्रिकल वस्तू चोरणाऱ्या गुन्हेगारांना अटक करण्यात यश मिळत आहे. अशाच एका चोरीच्या घटनेत स्थानिक गुन्हे अन्वेषण खात्याने फरीद अक्रम कोकरे (२८) याला अटक केली आहे.
रोहा येथील खालचा मोहल्ला येथील फरीद हा रहिवासी आहे. याच युवकाचा मुरूड येथील चोरीच्या घटनेशी संबंध येत असल्याने त्‍याचा ताबा मुरूड पोलिसांना देण्यात आला होता.
फरीदने मुरूड शहरातील पेठ मोहल्ल्यातील वहिदा इस्माईल मिसरी यांच्या राहत्या घरातून महागडा मोबाईल चोरून नेला होता. याबाबतची तक्रार ६ नोव्हेंबरला मुरूड पोलिस ठाण्यात नोंदवली होती. आरोपी माहिती मिळताच मुरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी फरीदला न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल अतिग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अविनाश झावरे करत आहेत.