स्नेहमिलनातून शालेय स्मृतींना उजाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्नेहमिलनातून शालेय स्मृतींना उजाळा
स्नेहमिलनातून शालेय स्मृतींना उजाळा

स्नेहमिलनातून शालेय स्मृतींना उजाळा

sakal_logo
By

मुरूड, ता. २१ (बातमीदार) ः सर एस. ए. विद्यालयात १९७२-७३ च्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्‍थ्‍यांनी स्‍नेहसंमेलन आयोजित करीत तब्बल ५० वर्षांनतर शालेय आठवणींना उजाळा दिला. कोकण किनारपट्टीवरील नबाबकालीन शाळेला १५० वर्षांची परंपरा असून या शाळेतील हजारो विद्यार्थी देश-विदेशात उच्च पदावर कार्यरत आहेत. सुमारे ८० माजी विद्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्‍थित होते. स्नेह मेळाव्यात अलका पालवणकर-मुळे, नैनिता कर्णिक, अविनाश साळी आदींनी मनोगतातून आपल्या भावनांना वाट करून देत शाळेचे तसेच शिक्षकांचे ऋण व्यक्त केले. या वेळी जं. वि. मंडळाच्या उपाध्यक्षा प्रतिभा जोशी, संचालक प्रमोद भायदे, प्रकाश विरकुड, उदय दांडेकर, अभय दिवेकर, मुख्याध्यापक सरोज राणे यांचा सत्कार करण्यात आला.
मुरूड ः