विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्यासाठी विशेष अनुदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्यासाठी विशेष अनुदान
विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्यासाठी विशेष अनुदान

विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्यासाठी विशेष अनुदान

sakal_logo
By

मुरूड, ता. ११ (बातमीदार) : मुरूड नगरपरिषद ही नवाबकालीन आणि कोकणातील सर्वांत जुनी आहे. मुरूड शहरातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा नैपुण्य वाढीस लागावे आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. या पार्श्वभूमीवर खेळात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुरूड नगरपरिषदेतर्फे विशेष अनुदान देणार असल्याची माहिती मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी केले.
मुरूड शहरातील सर एस. ए. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, अंजुमन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, ओंकार विद्यामंदिर, अंजुमन इस्लाम डिग्री महाविद्यालय, वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालय आदींमधून सुमारे तीन हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांपैकी विविध खेळांमधून सर्वोत्कष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुरूड नगरपरिषदेतर्फे विशेष अनुदान देणार असल्याचे भुसे यांनी सूचित केले. क्रीडा क्षेत्रामध्ये विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थी -विद्यार्थानीला पाच हजार रुपये प्रत्येक वर्षी प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. याशिवाय, वरिष्ठ महाविद्यालयातून विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थी -विद्यार्थानीला ७५०० रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार असल्याची माहिती या वेळी भुसे यांनी दिली.

संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व प्राचार्यांकडून दरवर्षी डिसेंबरअखेर प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांची माहिती देणे आवश्यक असणार आहे. तसेच वरील शैक्षणिक संस्थांना वार्षिक क्रीडा साहित्य खरेदी, देखभाल दुरुस्तीसाठी विशेष अनुदान म्हणून दहा हजार रुपये नगरपरिषदेमार्फत देण्यात येणार आहे.
- पंकज भुसे, मुख्याधिकारी, मुरूड