श्रीधर जंजीरकर यांचा विशेष सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीधर जंजीरकर यांचा विशेष सत्कार
श्रीधर जंजीरकर यांचा विशेष सत्कार

श्रीधर जंजीरकर यांचा विशेष सत्कार

sakal_logo
By

मुरूड, ता. ११ (बातमीदार) : तालुक्यातील नांदगाव श्रीधर रघुनाथ जंजिरकर यांचा अलिबाग आवास येथे सुरू असलेल्या क्षात्रैक्य कृषक महोत्सवात विशेष सत्कार करण्यात आला.
क्षात्रैक्य कृषक महोत्सवाचे स्वागताध्यक्ष अभिजित राणे, अध्यक्ष द्वारकानाथ नाईक, कार्याध्यक्ष प्रदीप नाईक, सचिव श्रीनाथ कवळे, क्षात्रैक्य समाज अलिबागचे अध्यक्ष अविनाश राऊळ यांच्या हस्ते श्रीधर जंजीरकर यांचा शाल, श्रीफळ, प्रशस्तिपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. जंजीरकर हे १८ वर्षांपासून शेती व्यवसाय करत आहेत. गांडूळ खत प्रकल्प, भाजीपाला लागवड, मल्चिंग पेपरवरील भातशेती, असे विविध उपक्रम राबवून शेतीमध्ये विविध विक्रमी पीक ते घेत असतात. किसान क्रांती संघटनेमार्फत स्थानिक शेतकऱ्यांना शेतीविषयक प्रशिक्षण देणे, शेतकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर, शेतकऱ्यांना पॉवर ट्रिलर देणे, शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकरी जोडप्यांचा सत्कार करणे, असे विविध उपक्रम संघटनेमार्फत राबवत असतात. या सर्व कार्याची दखल महोत्सवात घेण्यात आली.