मुरूडमध्ये आनंददायी बाल मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुरूडमध्ये आनंददायी बाल मेळावा
मुरूडमध्ये आनंददायी बाल मेळावा

मुरूडमध्ये आनंददायी बाल मेळावा

sakal_logo
By

मुरूड, ता. २१ (बातमीदार) : विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी बाल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मोरे शाळेत हनुमान मंदिराच्या परिसरात केंद्र शिखरेचा आनंददायी बाल मेळावा उत्साहात पार पडला.
बाल मेळाव्याची सुरुवात शोभायात्रेने झाली. या शोभायात्रेतील श्रीकृष्ण, राधा व गोपिका, भारतमाता, छत्रपती शिवाजी महाराज, आदिवासी वेशभूषा, सैनिक, विविध रंगी नटलेले बाल, लेझीम पथकाने व बँड पथकाने मोरे गावचा परिसर अगदी दणदणून गेला. बाल मेळाव्याचे अध्यक्ष श्रुतिका शरद नाक्ती ही होती. तर आर्यन वाघमारे याच्या हस्ते फीत कापून बाल मेळाव्याचे उद्‍घाटन करण्यात आले. याप्रसंगी मुरूड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बी. के. पाखरे शिघ्रे केंद्राचे केंद्रप्रमुख शिवप्रसाद रोडगे, नरेश दिवाकर, रमेश, महेश दिवेकर; सर्व शाळांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी गटशिक्षणाधिकारी बी. के. पाखरे यांनी मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या. अध्यक्षा श्रुतिका हिने बालमेळाव्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात केली. सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत विविध पारंपरिक गीत, नृत्य, तसेच विविध अंगी एकांकिका व नाटिका सादर करण्यात आल्या. मेळाव्यात संगीत खुर्ची, चमचा लिंबूसारखे मनोरंजनात्मक खेळ झाले. आनंददायी बालमेळाव्याला शिघ्रे केंद्रातील माजी शिक्षक रूपेश बांद्रे, जयवंत देडगे, सोनाली राख, आगरदांडा केंद्राचे केंद्रप्रमुख जितेंद्र मकू, नांदगाव केंद्राचे केंद्रप्रमुख दिनेश म्हात्रे व निखिल मानाजी, प्रभुलिंग कोरके आदींनी भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्ती भगत, चेतन मकु व सुग्रीव चव्हाण यांनी केले, तर आभार चेतन चव्हाण यांनी मानले.