मुरूडमध्ये मोफत नेत्रतपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुरूडमध्ये मोफत नेत्रतपासणी
मुरूडमध्ये मोफत नेत्रतपासणी

मुरूडमध्ये मोफत नेत्रतपासणी

sakal_logo
By

मुरूड, ता. ३० (बातमीदार) : मकरंद शरदचंद्र कर्णिक आयोजित लायन्स हेल्थ फाऊंडेशन व समता फाऊंडेशन मुंबई यांच्या सहकार्याने मुरूडमध्ये मंगळवारी (ता. ३१) मोफत नेत्रतपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुरूड शहरातील कर्णिक हाऊस, मधली आळी या ठिकाणी हे शिबिर सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत आहे. शिबिरातील मोतीबिंदू शस्त्रक्रिया लायन्स हेल्थ फाऊंडेशन चोंढी-अलिबाग येथे केली जाईल. तपासणीसाठी येताना आधार कार्ड आवश्यक आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांची जेवण व काळ्या चष्म्याची सुविधा लायन्सतर्फे करण्यात येईल. रुग्णांची ने-आण समता फाऊंडेशन विनामूल्य करणार आहे. शिबिरात डोळ्यांवर मांस वाढणे किंवा वेल येणे, अश्रू ग्रंथी, तिरळेपणा, लहान मुलांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया आदी मोफत करण्यात येणार आहे. मात्र, शस्त्रक्रिया पूर्व रक्त तपासणीसाठी ५०० रुपये अनामत म्हणून भरावे लागणार आहेत. इच्छुकांनी बाळा भगत - ९२०९०४१४१९, उमेश माळी -९१४६५६१५५५ यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.