
मुरूडमध्ये शिंदे गटात जल्लोष
मुरूड, ता. १८ (बातमीदार) : भारतीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्हासह शिवसेना नावाचीही मान्यता घोषित करताच शनिवारी (ता. १८) मुरूड शहरातील बाजारपेठेत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाक्यांची आतिषबाजी करून एकमेकांना पेढा भरवत आनंद साजरा केला. या वेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. घोषणाही दिल्या. तालुकाप्रमुख ऋषिकांत डोंगरीकर, माजी नगरसेविका युगा ठाकूर, मेघाली पाटील, गिरीश साळी, संदीप पाटील, समीर दौनाक, महेश पाटील, महेंद्र भाटकर, बाबू सुर्वे, किशोर माळी, तुषार कारभारी, राकेश मसाल, नितीन आंबुर्ले, वीरेंद्र भगत, योगेश ठाकूर, अनंता शेडगे, सागर चौलकर आदींसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुरूड तालुकाप्रमुख ऋषिकांत डोंगरीकर यांनी सांगितले, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन शिंदेसाहेब पुढे आले. त्यांनी पक्षातील आमदारांना भरघोस निधी प्रदान करून विकासाची दालने खुली केली आहेत. निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य असून, त्याचे आम्ही समर्थन करत आहोत.