
दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
मुरूड (बातमीदार) : नांदगाव येथील श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय यशवंतनगर येथील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संस्थेचे अध्यक्ष फैरोज घलटे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन करताना सांगितले, शिक्षकांनी आमच्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. शालेय स्मृती जागवत शाळेचा निकाल १०० टक्के लागणे हे आमचे दायित्व ठरले आहे. पर्यवेक्षक श्रीधर ओव्हाळ व सहशिक्षक राहील घलटे यांनी विद्यार्थ्यांना कानमंत्र देत प्रोत्साहित केले. तर अध्यक्षीय भाषणात फैरोज शेठ यांनी कॉपीचा अवलंब न करता उज्ज्वल यश मिळवण्यासाठी आवाहन केले. कार्यक्रमासाठी संचालक कृष्णा अंबाजी, संचालक अरविंद भंडारी, पर्यवेक्षक श्रीधर ओव्हाळ, अर्चना खोत, राहील घलट्टे, योगेश पाटील, प्रतीक पेडणेकर, रवींद्र ढोले, दत्तात्रेय खुळपे, महेश वाडकर, रेखा बोर्जी, भारत चव्हाण, सागर राऊत, आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांकडून शाळेला दोन साऊंड बॉक्स आणि फ्रेम भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर राऊत, तर आभार महेश वाडकर यांनी मानले.