रंगाची उधळण करत शेकडो मच्छीमार दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रंगाची उधळण करत शेकडो मच्छीमार दाखल
रंगाची उधळण करत शेकडो मच्छीमार दाखल

रंगाची उधळण करत शेकडो मच्छीमार दाखल

sakal_logo
By

मुरूड, ता. ७ (बातमीदार) : आमच्या दाराशी हाय शिमगा, सण शिमग्याचा आयलाय रे आमचे गावा'' अशा पारंपरिक गाण्यांच्या तालावर सोमवारी (ता. ६) कोळी बांधव थिरकताना दिसले. मुरूड शहरात ''एक गाव एक होळी'' ही प्रथा नसली, तरी दरवर्षाप्रमाणे यंदाही होळीसाठी एकदरा, राजपुरी, मुरूड कोळीवाड्यातील मच्छीमार बांधवांनी पारंपरिक वेशभूषा करत होळी सण साजरा केला. किनारपट्टीवर शेकडो होड्यांवरील खलाशी, नाखवा रंगाची उधळण करत रंगीबेरंगी झेंडे मिरवत दाखल झाले आहेत. मुरूडसह आगरदांडा, राजपुरी, एकदरा, मुरूड कोळीवाडा या ठिकाणी ४५० ते ५०० नौका शिमग्यानिमित्त नांगरून ठेवल्या होत्या. कोळीवाड्यातील महिला एकाच रंगाच्या साड्या परिधान करून अग्नि देवतेला फेर धरणारी नृत्य कला ही खरोखर थक्क करणारी असते. या वेळी मासळीचा दुष्काळ, रखडलेले डिझेल परतावे, मासेमारीसाठी लागणारा खर्च हे सर्वच गणित कोळी समाजाचे बिघडल्याची व्यथा सागरकन्या मच्छीमार संस्थेच्या अध्यक्षांनी बोलून दाखवली.