मुरुड तालुक्यात आंदोलनाचे पडसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुरुड तालुक्यात आंदोलनाचे पडसाद
मुरुड तालुक्यात आंदोलनाचे पडसाद

मुरुड तालुक्यात आंदोलनाचे पडसाद

sakal_logo
By

मुरूड, ता. १४ (बातमीदार)ः ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ असे फलक झळकावत मुरूड नगर परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी नगरपरिषदेसह विविध शासकीय संघटनातील कर्मचाऱ्यांनी काढलेल्या मोर्चात सहभाग घेतला होता.
तालुक्यातील राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामपंचायत, कंत्राटी कर्मचारी समन्वय समितीने राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या आदेशान्वये बेमुदत संपावर गेले आहेत. जुनी पेन्शन योजनेसह रिक्त पदे तत्काळ भरा, निवृत्तीचे वय ६० करा, नवीन शिक्षण धोरण रद्द करा, अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. मुरूड तहसीलदार कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या वेळी तहसीलदार रोहन शिंदे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान, या आंदोलनामुळे शासकीय, प्रशासकीय कामाचा खोळंबा झाल्याचे चित्र होते.