समुद्र किनाऱ्यावरील दगड चोरीविरुद्ध गुन्हा

समुद्र किनाऱ्यावरील दगड चोरीविरुद्ध गुन्हा

मुरूड, ता. २१ (बातमीदार) ः मुरूड समुद्र किनारी पर्यटकांच्या वाहनतळासाठी नगरपरिषदेकडून मातीचा थर व मोठमोठ्या दगड टाकून तात्पुरत्या स्वरूपात वाहनतळ बनवले आहे. परंतु पर्यटकांसाठी बांधण्यात आलेल्या चेंजिंग रूम ते तवसाळकर वाडीदरम्यान अंदाजे तीनशे मीटरच्या अंतरावरील दगड गायब झाल्याची तक्रार मुरूड पोलिस ठाण्यात नगरपरिषदेतर्फे करण्यात आली आहे. ९० ते ते १०० ब्रास खडी चोरीला गेली असून अंदाजे ३ ते ४ लाखांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
मुरूड नगरपरिषदेकडून चेंजिंग रूम ते तवसाळकर पकटी या भागात धूप प्रतिबंधात्मक बंधारा, पाथ वे व वाहनतळ बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्‍यासाठी आणलेले दगड-खडी चोरीला गेल्‍याचे नगरपरिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले. याप्रकरणी मुरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com