मुरूड बाजार समितीवर विकास परिवर्तनची आघाडी

मुरूड बाजार समितीवर विकास परिवर्तनची आघाडी

मुरूड, ता. २५ (बातमीदार) : मुरूड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक येत्या ३० एप्रिलला होणार आहे. या कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेना, भाजप व काँग्रेस आय अशी आघाडी करून विकास परिवर्तन आघाडी स्थापन करण्यात आली आहे. विकास परिवर्तन आघाडीचे दर्शन काळबेरे व मोअज्जम हसवारे हे दोन सदस्य बिनविरोध निवडून आल्याने कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. मुरूड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे एकूण १७ सदस्य असून, त्यापैकी चार सदस्य बिनविरोध निवडून आलेत. आता ३० एप्रिलला उर्वरित १३ जागांसाठी मतदान होणार आहे.
मुरूड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक १५ वर्षांपासून बिनविरोध झालेली आहे. तेव्हापासून या समितीवर शेकापचे प्राबल्य आहे. यंदा प्रथमच निवडणूक होत असल्याने कोणत्या पक्षाचे वर्चस्व राहणार, याची मोठी उत्सुकता नागरिकांना लागली आहे. विकास परिवर्तन आघाडीचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करून विजय साजरा केला. संचालक म्हणून निवडून आलेले मोअज्जम हसवारे व दर्शन काळबेरे यांचे अभिनंदन करण्यात आले. या वेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरत बेलोसे, मुरूड तालुकाप्रमुख ऋषिकांत डोंगरीकर, मुरूड तालुका भाजप अध्यक्ष महेंद्र चौलकर, काँग्रेस आय तालुकाध्यक्ष सुभाष महाडिक, शिवसेनेचे नेते भाई सुर्वे, सी. एम. ठाकूर, नीलेश घाटवळ, सरपंच स्वस्तिक ठाकूर, शैलेश काते, जयवंत आंबाजी, अमोल लाड, महेंद्र दिवेकर, काळी ठाकूर, अनिल चोरडेकर, संतोष ठाकूर, प्रीतम पाटील, गणेश कट, रामप्रीत जयस्वाल, यशवंत पाटील उपस्थित होते.

विकास परिवर्तन आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष सोबत आल्याने आमची ताकद वाढली आहे. या निवडणुकीत ग्रामपंचायत विभागामधून चार आणि शेतकरी विभागामधून दोन सदस्य असे आता सहा जागा लढवणार आहोत. या निवडणुकीत आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यप्रणालीवर लोकांचा विश्वास वाढल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीवर आमचे जास्तीत जास्त संचालक निवडून जातील असा विश्वास आहे.
- सी. एम. ठाकूर, शिवसेना नेते, मुरूड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com