माथेरान दस्तुरी पार्किंगमध्ये गाडीने घेतला पेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माथेरान दस्तुरी पार्किंगमध्ये गाडीने घेतला पेट
माथेरान दस्तुरी पार्किंगमध्ये गाडीने घेतला पेट

माथेरान दस्तुरी पार्किंगमध्ये गाडीने घेतला पेट

sakal_logo
By

अजय कदम, माथेरान, ता. ७ : पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरान येथे फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकाच्या वाहनाला शनिवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना दस्तुरी नाका येथील पार्किंगमध्ये घडली. सध्या वीकेंडचा आनंद घेण्यासाठी माथेरान येथे पर्यटनासाठी आलेल्या विलेपार्ले येथील सिद्धेश पवार व अन्य टाटा इंडिका गाडीने नेरळ-माथेरान येथे प्रवास करत होते. दस्तुरी नाका येथील पार्किंगमध्ये पोहोचताच वाहनाच्या बोनेटमधून धुराचे लोट येऊ लागले. या वेळी स्थानिकांच्या मदतीने बोनेट उघडताच संपूर्ण गाडीच आगीच्या भक्ष्यस्थानी आली. सदर घटना येथील पार्किंगमध्ये घडल्याने आजूबाजूला उभी असलेली वाहने तसेच आगीचे तांडव पाहून पर्यटक तसेच स्थानिकांमध्ये काही वेळापुरते भीतीचे वातावरण होते. या वेळी आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रसंगावधान राखत वन संरक्षण समितीचे कर्मचारी तसेच नेरळ-माथेरान टॅक्सीचालकांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण आणले. या वेळी माथेरान अग्निशमन वाहनालादेखील पाचारण करण्यात आले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mth22b00861 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top