
माथेरान येथे मिनीबसचा मार्ग मोकळा
माथेरान, ता. १२ (बातमीदार) ः गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला नगरपालिकेचा नेरळ-माथेरान मिनी बस प्रश्न मार्गी लागण्याच्या हालचालींना वेग आला आहे. माथेरान नगर परिषदेने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पेण विभागाकडून ना हरकत दाखला मिळावा म्हणून मागणी केली होती. तिला हिरवा कंदील मिळाल्याने माथेरानकरांचे नगर परिषदेच्या मिनी बस सेवा सुरू होण्याचे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे.
माथेरान हे गिरीशिखरावरील पर्यटनस्थळ आहे. येथे येण्यासाठी सात किलोमीटरच्या घाटरस्त्यातून यावे लागते. मागील दोन वर्षांपूर्वी हा घाटरस्ता एमएमआरडीएमार्फत बनवण्यात आला आहे. येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची मिनी बस सुरू आहे. मात्र येथील विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी माथेरान बाहेर जावे लागत आहे. काही नोकरदार वर्ग नोकरीसाठी माथेरान बाहेर जात आहेत. त्यामुळे मिनी बस असावी, अशी मागणी होती. याबाबत माजी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या कारकिर्दीत एक ठराव देखील करण्यात आला होता. मुख्याधिकारी तथा प्रशासक सुरेखा भणगे-शिंदे यांनी पाठपुरावा सुरू केला होता. सुरुवातीला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पेण विभागाकडे ना हरकत दाखल्यासाठी मागणी केली होती. त्यानुसार पेण विभागाकडून मिनी बस सुरू करण्याबाबत ना हरकत दाखला देण्यात आला आहे. याबाबत माजी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी आनंद साजरा करत नगरपालिकेत मिनी बस खरेदीसाठी तरतूद केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mth22b00864 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..