माथेरानमध्ये दंगलविरोधी पथकाचे पथसंचलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माथेरानमध्ये दंगलविरोधी पथकाचे पथसंचलन
माथेरानमध्ये दंगलविरोधी पथकाचे पथसंचलन

माथेरानमध्ये दंगलविरोधी पथकाचे पथसंचलन

sakal_logo
By

माथेरान, ता. २६ ( बातमीदार) ः शिवसेनेच्या दोन गटात हाणामारी झाल्यानंतर पोलिस प्रशासन ऍक्शन मोडमध्ये आले आहे. पर्यटनस्थळावर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या हेतूने रविवारी दंगल विरोधी पथकाने माथेरान शहरात पथसंचलन केले
२४ जूनच्या रात्री माथेरानमध्ये शिवसेना ग्रुपवर चॅटिंगच्या माध्यमातून दोन गटात वाद झाला आणि त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. तसेच न्यायालयातून परतताना प्रसाद सावंत यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्‍ला केला. त्यात त्यांच्या हाताला दुखापत झाली. या पार्श्वभूमीवर माथेरानमध्ये पडसाद उमटू नये यासाठी रविवारी माथेरान पोलिस ठाण्याचे साहाय्यक निरीक्षक शेखर लव्हे यांनी बंदोबस्त वाढवून दुपारी बारा वाजता पथसंचलन केले.

कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा जो प्रयत्न करील त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. कोणीही कायदा हातात घेऊ नये. माथेरान हे शांत पर्यटनस्थळ आहे. या शांततेचा भंग कुणीही करू नये.
- शेखर लव्हे, सहाय्यक निरीक्षक, माथेरान

Web Title: Todays Latest Marathi News Mth22b00908 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top