आदित्य ठाकरेंकडून प्रसाद सावंत यांची विचारपूस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदित्य ठाकरेंकडून प्रसाद सावंत यांची विचारपूस
आदित्य ठाकरेंकडून प्रसाद सावंत यांची विचारपूस

आदित्य ठाकरेंकडून प्रसाद सावंत यांची विचारपूस

sakal_logo
By

माथेरान, ता. २८ (बातमीदार)ः युवासेना प्रमुख व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी कामोठेतील एमजीएम रुग्णालयात जाऊन तेथे उपचार घेत असलेले माथेरानमधील शिवसेनेचे शहर संपर्क प्रमुख प्रसाद सावंत यांची भेट घेतली. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती घेत उपचारासंदर्भात विचारपूस केली.
प्रसाद सावंत यांच्यावर २५ जून रोजी कर्जत येथे काही अज्ञातांनी हल्ला केला होता. जखमी झाल्याने त्यांना कामोठे एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तसेच संजय राऊत यांनी रुग्णालयात जाऊन सावंत यांच्या तब्येतीची विचारपूस केली व त्यांना धीर दिला. तसेच त्यांना दिलेल्‍या पोलिस संरक्षणाचीही माहिती घेतली. या वेळी उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, माथेरानचे माजी नगराध्यक्ष अजय सावंत, युवासेना रायगड जिल्हा युवा अधिकारी मयूर जोशी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mth22b00910 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top