माथेरानमध्ये अतिवृष्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माथेरानमध्ये अतिवृष्टी
माथेरानमध्ये अतिवृष्टी

माथेरानमध्ये अतिवृष्टी

sakal_logo
By

माथेरान, ता. १३ (बातमीदार) : गिरीस्थान असलेल्या माथेरानमध्येही मुसळधार पावसाने दाणादाण उडवून दिली. मंगळवार सकाळी साडेआठ ते बुधवारी सकाळी साडेआठपर्यंत माथेरानमध्ये तब्बल २१७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. माथेरानमध्ये आतापर्यंत ४३ दिवसात तब्बल १९७७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, जुमापट्टी येथे वीज वाहिनीवर झाड पडल्यामुळे माथेरानचा वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच माथेरान पोलिस ठाण्यासमोर असलेल्या जनीत्रावरही झाड कोसळले. हे झाड कर्मचाऱ्यांकडून हटवण्यात आल्याची माहिती वीज अभियंता संतोष पादिर यांनी दिली.
बुधवारी अतिवृष्टी होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आल्यानंतर स्थानिक प्रशासनाने समाजमाध्यमावरून स्थानिकांना सतर्क केले होते. मुख्याधिकारी सुरेखा भणगे, अधीक्षक दिक्षांत देशपांडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शेखर लव्हे, तसेच वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश जंगम आदी सर्व अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तर उद्याचा (गुरुवार) दिवसही माथेरानसाठी अतिवृष्टीचा असणार आहे, असा अंदाज रायगड जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mth22b00915 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top