ऐतिहासिक वास्तू असलेले माथेरानचे देवस्थान पिसारनाथ मंदिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऐतिहासिक वास्तू असलेले माथेरानचे देवस्थान पिसारनाथ मंदिर
ऐतिहासिक वास्तू असलेले माथेरानचे देवस्थान पिसारनाथ मंदिर

ऐतिहासिक वास्तू असलेले माथेरानचे देवस्थान पिसारनाथ मंदिर

sakal_logo
By

माथेरान हे पर्यटन स्थळ असले, तरी येथे ऐतिहासिक वास्तू दिमाखात उभ्या आहेत. येथे येणाऱ्या पर्यटकांना या वास्तूंविषयी खूप कमी माहिती आहे. त्यातील एक ऐतिहासिक वास्तू म्हणजे माथेरानचे देवस्थान श्री पिसारनाथ मंदिर होय. अनेक सिनेकलावंतांची पिसारनाथावर श्रद्धा आहे. मंदिराच्या भोवताली घनदाट जंगल, प्रवेशद्वारासमोर शारलोट तलाव, नयनरम्य वातावरण यामुळे हे मंदिर आपली वेगळीच छाप सोडत आहे.

मॅलेट या इंग्रज कलेक्टर यांनी १८५० मध्ये माथेरानचा शोध लावला. त्यांच्याबरोबर एक धनगर आला होता. हा समाज माथेरानच्या पायथ्याशी वसला होता. त्यांच्या गाई चरणासाठी माथेरानच्या डोंगरावर गवळी आणत असे. त्यातील एक गाय गवळ्याची नजर चुकवून शारलोट तलावाच्या बाजूच्या जंगलात जाऊन झाडाच्या मुळाशी आपला पान्हा दररोज सोडत असे. परिणामी, या गाईकडून त्याला दुधाचे प्रमाण कमी मिळत होते. यासाठी त्यांनी गाईवर पाळत ठेवली. एक दिवस गाय त्या कळपातून वेगळी होऊन झाडाजवळ गेली. तेथे पान्हा देत असताना गवळ्याने पाहिले. त्यावेळी तो अचंबित झाला. ही बाब त्यांनी गावकऱ्यांना सांगितली. गावकऱ्यांनी तिथे थोडे खोदकाम केले. त्या वेळी त्यांना शिवलिंग दिसले. काही दिवसांनंतर ग्रामस्थांनी माथेरानचे देवस्थान म्हणून पिसारनाथ मंदिर बांधले, अशी आख्यायिका आहे.
आजही या मंदिरात धार्मिक कार्यक्रम होत असतात. काही नागरिकांची ही श्रद्धा आहे की, मंदिरात केलेली पूजा सफल होते. श्रावणातील पहिल्या सोमवारी या मंदिरात क्षत्रिय मराठा समाजाकडून महाभिषेक सोहळा आयोजित केला जातो. मात्र, कोविडकाळात दोन वर्षे मंदिरात प्रवेशबंदी होती. यावर्षी मोठ्या दिमाखात हा सोहळा रंगणार आहे.
-------------------------------------------
पिसारनाथ का म्हणतात?
ज्येष्ठ नागरिकांच्या म्हणण्यानुसार माथेरान उदयास येण्याअगोदर शंकर भगवान पिसा नावाच्या झाडाच्या खोडामध्ये प्रकट झाले होते. यामुळे त्या मंदिराला पिसारनाथ मंदिर म्हटले जाते.
-------------------------------------------
सिनेकलावंतांची आवर्जून भेट
अनेक सिने कलावंतानी केलेली प्रार्थना सफल झाल्यामुळे दरवर्षी न चुकता या मंदिराला भेट देत असतात. यामध्ये जॅकी श्रॉफ, चित्रपट निर्माती नीता निहलानी हे न विसरता या मंदिरामध्ये येऊन तासन् तास नि:शब्द बसून प्रार्थना करत असतात.
--------------------------------------------
- अजय कदम, माथेरान

Web Title: Todays Latest Marathi News Mth22b00928 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top