माथेरानमध्ये अश्वपालांचा मूक मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माथेरानमध्ये अश्वपालांचा मूक मोर्चा
माथेरानमध्ये अश्वपालांचा मूक मोर्चा

माथेरानमध्ये अश्वपालांचा मूक मोर्चा

sakal_logo
By

माथेरान, ता. ३ (बातमीदार) ः माथेरानमध्ये सध्या ई-रिक्षाची चाचणी सुरू आहे. त्‍यामुळे लवकरच त्‍या शहरात सेवेसाठी दाखल होतील. त्‍यामुळे घोडेस्‍वारी करणाऱ्‍‌या पर्यटकांची संख्या कमी होऊन व्यवसायावर परिणाम होईल, अशी भीती अश्‍वपालांना सतावत आहे. याच भीतीपोटी अश्वपाल संघटना आणि मूळवासीय अश्वपाल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी माथेरान नगरपालिकेवर मूक मोर्चा काढण्यात आला होता.
सकाळी साडेअकराच्या सुमारास पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकातून कुटुंबासह भर पावसात अश्‍वपालांनी मूक मोर्चाला सुरुवात केली. संघटनेच्या अध्यक्षा आशा कदम, उपाध्यक्ष सचिन पाटील, माजी नगराध्यक्षा वंदना शिंदे, तसेच सर्व अश्वचालक मोर्चामध्ये सहभागी झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने २७ जुलै रोजी शहरात ई-रिक्षांची चाचणी घेण्यात आली. या वेळी रिक्षांमध्ये ३ ते ४ अधिकारी बसून दस्तुरी ते रेल्वेस्‍थानकापर्यंत आले होते. हे पाहून अश्वपालांच्या तोंडचे पाणी पळाले. त्यामुळे जागोजागी बैठका घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी मूक मोर्चा काढण्यासंदर्भात चर्चा झाली.


ई-रिक्षात ३ ते ४ पर्यटक एका वेळेस येणार, त्यामुळे घोड्याच्या व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते. येथील ४० टक्के लोक हे घोड्याच्या व्यवसायावर उदरनिर्वाह करतात. सरकारने घोडेवाल्यांचाही विचार केला पाहिजे. आता कायदेशीर लढाई सुरू करण्यासंदर्भात विचार सुरू आहे.
- आशा कदम, अध्यक्षा, अश्‍वपाल संघटना


आंदोलनामुळे घोडे सवारी बंद
माथेरानमधील सर्वच अश्वपाल कुटुंबासह मूक मोर्चात सहभागी झाले होते. घोडेस्‍वारी बंद असल्‍याने पर्यटकांची गैरसोय झाली. पर्यटनस्‍थळी येऊनही घोड्यावर रपेट मारता न आल्‍याने अनेकांचा हिरमोड झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Mth22b00933 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top