माथेरानमध्ये वीज वितरणाचा शटडाऊन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माथेरानमध्ये वीज वितरणाचा शटडाऊन
माथेरानमध्ये वीज वितरणाचा शटडाऊन

माथेरानमध्ये वीज वितरणाचा शटडाऊन

sakal_logo
By

माथेरान, ता. २३ (बातमीदार) ः गणेशोत्‍सवात वीज पुरवठा खंडित होण्याचे विघ्न येऊ नये, यासाठी माथेरानमधील वीज वितरण विभागाने अखंडित वीज मोहीम हाती घेऊन एक दिवसीय शटडाऊन घेत जनित्र, केबल, डिओलाईन वरील झाडांच्या फांद्या यावर लक्ष केंद्रित करून काम सुरू केले आहे.
माथेरानमध्ये वन विभाग मोठा असून माकडांची संख्याही अधिक आहे. पावसाळ्यात माकडांना खाद्यासाठी फिरावे लागते. या शोधात ते काही वेळा जनित्रावर येतात. परिणामी वीज वाहन सुरू असल्याने शॉक बसतो. हे टाळण्यासाठी वीज वितरणचे अभियंता संतोष पादिर यांनी खुल्‍या वीज वाहिन्या पाईपमध्ये करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले. रिगल नाका, श्रीराम चौक, हुतात्मा स्मारक, दस्तुरी नाका येथील जनित्रांना संरक्षित करण्यासाठी एक दिवसीय शटडाऊन घेतला.

माथेरानमधील जनित्रावर माकडे खेळण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यांना शॉक लागू नये यासाठी जनित्रावरील केबल आणि वीज वाहिन्या संरक्षित करण्यासाठी पाईपमधून केबल टाकण्याचे काम सुरू आहे. याशिवाय अखंडित वीज पुरवठ्यासाठी देखभाल-दुरुस्‍तीचेही काम हाती घेतल्‍याने सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत शटडाऊन होता.
- संतोष पादिर, अभियंता, माथेरान वीज वितरण विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Mth22b00954 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..