अखेर सनसेट पॉईंटला नवी झळाळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर सनसेट पॉईंटला नवी झळाळी
अखेर सनसेट पॉईंटला नवी झळाळी

अखेर सनसेट पॉईंटला नवी झळाळी

sakal_logo
By

माथेरान, ता. ३ (बातमीदार) : पर्यटकांना भुरळ घालणारा माथेरानमधील पार्क्युपाईन पॉईंट अर्थात सनसेट पॉईंटची दुरवस्था झाली होती. यासंदर्भातील वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर नगरपालिकेने त्याची दखल घेत तत्काळ या ठिकाणी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. येथील शौचालयाची झालेली दुरवस्थाही पालिकेकडून दूर करण्यात आली आहे. यामुळे सनसेट पॉईंटला नवी झळाळी मिळाली आहे.
सनसेट पॉईंट ३८ पॉईंटपैकी महत्त्वाचा आहे. याकडे जाणारा रस्ता पूर्ण खराब झाला आहे. सुरक्षा कठडे धोकादायक स्थितीत आहेत. शौचालयाचीही दुरवस्था झाली होती. यासंदर्भातील वृत्त ‘सकाळ’ने ३० ऑक्टोबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते. ही गंभीर बाब नगरपालिकेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगे-शिंदे यांच्या लक्षात येताच त्यांनी सर्वप्रथम शौचालयाला प्रथम प्राधान्य दिले. या शौचालयाची दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच, नवीन जलवाहिनीही टाकण्यात आली आहे. यामुळे शौचालयाला योग्य पाणीपुरवठा होणार असून त्याची स्वच्छताही वेळेत केली जाणार आहे.

सनसेट पॉईंटवर पर्यटक येतात. त्यांच्यासाठी ही सुविधा अतिमहत्त्वाची आहे. याकडे प्राधान्य देऊन शौचालय सुस्थितीत आणले आहेत. या पॉईंटकडे जाणारा रस्ता लवकरच केला जाईल. जेणेकरून घोड्यांना आणि घोडेवाल्यांना कोणताही त्रास होणार नाही. सुरक्षा कठडे आणि रेलिंगचे काम हे वन व्यवस्थापन समितीकडे असल्याने त्याचा निर्णय समिती घेईल.
- सुरेखा भणगे-शिंदे, मुख्याधिकारी, माथेरान