माथेरानमध्ये दुचाकीचोरांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माथेरानमध्ये दुचाकीचोरांना अटक
माथेरानमध्ये दुचाकीचोरांना अटक

माथेरानमध्ये दुचाकीचोरांना अटक

sakal_logo
By

माथेरान ता. १३ (बातमीदार)ः माथेरानमध्ये वन विभागाच्या पार्किंग बाहेर उभी केलेली दुचाकी चोरीला गेल्‍याची घटना घडली. येथील सीसी टीव्ही फुटेजवरून चार आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. ११ नोव्हेंबरला सायंकाळी साडेसातच्या सुमारास रामचंद्र ठमके आपले काम आटोपून मूळ गावी धोतरे येथे जाण्यासाठी निघाले असता, पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी गायब होती. याप्रकरणी वन व्यवस्थापन समितीच्या पार्किंगमध्ये तपास सुरू करण्यात आला. मात्र तरीही दुचाकी न मिळाल्‍याने ठमके यांनी माथेरान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पार्किंगमध्ये लावलेल्या सीसी टीव्ही फुटेज तपासल्‍यावर दुचाकी पळवताना तरुण दिसले. त्‍यांच्यावर गुन्हा दाखल करून आरोपींपैकी तिघांना माथेरानहून तर एकास पुण्यातून अटक करण्यात आली.