माथेरानमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्यात भेकराचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माथेरानमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्यात भेकराचा मृत्यू
माथेरानमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्यात भेकराचा मृत्यू

माथेरानमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्यात भेकराचा मृत्यू

sakal_logo
By

माथेरान, ता. ५ (बातमीदार) ः पर्यावरण संवेदनशील क्षेत्र व वनसंपदेने आच्छादलेले गिरिस्थान माथेरानमध्ये भटक्‍या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. सोमवारी सकाळी भटकलेले भेकर लोकवस्‍तीत स्वैराचार करीत असताना चार-पाच भटक्या कुत्र्यांनी त्‍याच्यावर हल्‍ला केला. याठिकाणी कार्यरत सफाई कामगारांना भेकराची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका करण्याचा प्रयत्‍न केला, मात्र संरक्षणासाठी असलेल्‍या जाळीत भेकर अडकले आणि कुत्र्यांनी त्‍याचे लचके तोडले. याबाबत वनविभागाला माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत त्‍यांनी भेकराचा पंचनामा केला.