झाड अंगावर पडून घोड्याचा मृत्यू

झाड अंगावर पडून घोड्याचा मृत्यू

माथेरान, ता. २२ (बातमीदार) : पर्यटकांच्या सेवेसाठी घोडानाक्यावर उभा असलेल्या घोड्याच्या अंगावर अचानक झाड कोसळल्यामुळे घोड्याचा जागीच मृत्यू झाला. घोड्यावर झाड पडून मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. रिगल हॉटेलच्या समोर सोमवारी (ता. २२) सायंकाळी ही घटना घडली असून अश्व मालकांकडून हळहळ व्यक्त होत आहे.
माथेरानमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सबिल महापुळे यांचा परवाना असलेला हबीबी हा घोडा रिगल हॉटेलसमोर उभा होता. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास रिगल हॉटेलच्या कंपाऊंडमध्ये असलेले वाळलेले झाड अचानक कोसळले आणि ते घोड्याच्या डोक्यावर पडले. यामुळे घोड्याचा जागीच मृत्यू झाला. ही माहिती समजताच अश्वपाल संघटनेच्या अध्यक्षा आशा कदम यांनी आपल्या अश्व मालकांसह घटनास्थळ गाठले. पोलिसांकडून तसेच नगरपालिकेकडून पंचनामा करण्यात आला. पशूवैद्यकीय अधिकारी अमोल कांबळे यांनी शवविच्छेदन केले. सबिल महापुळे यांना भरपाई मिळावी अशी मागणी संघटनेकडून केली जात आहे.

-------
माथेरानमधील ३५ टक्के लोकांचा उदरनिर्वाह घोडा व्यवसायावर चालतो. उन्हाळी पर्यटन हंगाम आता कुठे सुरू झाला आहे आणि त्यातच आमच्या घोडेवाल्यावर ही वाईट वेळ आली आहे. त्यामुळे घोडामालकाला शासनाकडून भरपाई मिळावी अशी आमची मागणी आहे.
- आशा कदम, अध्यक्षा, स्थानिक अश्वपाल संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com