हातरिक्षा ओढताना चालकाचा मृत्यू

हातरिक्षा ओढताना चालकाचा मृत्यू

Published on

माथेरान, ता. ३१ (बातमीदार)ः माथेरानमध्ये पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकाला इच्छितस्थळी नेताना एका हातरिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे. मेरीटाइम हाऊसजवळ गुरुवारी सकाळी हा प्रकार घडला असून ई-रिक्षा वाटपातील दिंरगाईमुळे हातरिक्षा चालवण्याची अमानवी प्रथा जीवघेणी ठरली.
माथेरानमध्ये आलेल्या पर्यटकाला हातरिक्षामध्ये बसवून सकाळी साडेअकराच्या सुमारास मेरीटाइम हाऊसजवळ परशुराम पिरकट (वय ४५) भोवळ आल्याने जमिनीवर पडले. त्यांच्याबरोबर रिक्षा ओढणारा सहकारीपण अचानक झालेल्या या प्रकाराने गोंधळला. पिरकट यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. चरितार्थ चालवण्यासाठी आदिवासी समाजातील पिरकट हातरिक्षा ओढत होते; पण याच अमानवी प्रथेने त्यांचा जीव घेतल्याची चर्चा आता स्थानिकांमधून होत आहे.
--------------------------------------------------------------------
फक्त २० ई-रिक्षांचेच वाटप
माथेरानमध्ये एकूण ९४ हातरिक्षाचालक असून यातील सनियंत्रण समितीने फक्त २० ई-रिक्षाचालकांना परवानगी दिली आहे. बाकी ७४ ई-रिक्षाचालक हे चरितार्थ चालवण्यासाठी अजूनही हातरिक्षाच ओढतात. त्यामुळे ही अमानवी प्रथा बंद करून उर्वरित ९४ चालकांनादेखील परवानगी दिली गेली असती तर परशुराम यांनाही सन्मानाचे जीवन जगता आले असते, अशी प्रतिक्रिया ई-रिक्षाचालक श्रमिक संघटनेमधून उमटत आहे.
---------------------------------------------------------------------
संनियंत्रण समितीचा आडमुठेपणा
माथेरानमधील जडणघडणीच्या देखरेखीखाली संनियंत्रण समिती गठित केली आहे. समितीतील सर्व सदस्य माथेरानबाहेरील असल्याने त्यांना येथील भौगोलिक परिस्थितीचा अंदाज नाही. छातीचा पिंजरा करून आजही हातरिक्षाचालक पर्यटकांना इच्छितस्थळी पोहोचवतात; पण असे असतानाही ही अमानवी प्रथा बंद करण्यामध्ये संनियंत्रण समितीच्या काही मूठभर लोकांच्या आडमुठे धोरणांचा अडसर ठरत आहे.
----------------------------------------------
दस्तुरी येथून पर्यटकांना हातरिक्षामधून नेत असताना मेरीटाइम हाऊसजवळ परशुराम यांना भोवळ आली. ते रिक्षा सोडून जमिनीवर आदळले. त्यांना माथेरानमधील सरकारी रुग्णालयात दाखल केले; पण तोपर्यंत उशीर झाला होता.
- लक्ष्मण यादव, सहकारी हातरिक्षाचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com