सामाजिक एकोप्यासाठी पोलिसांची इफ्तार पार्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सामाजिक एकोप्यासाठी पोलिसांची इफ्तार पार्टी
सामाजिक एकोप्यासाठी पोलिसांची इफ्तार पार्टी

सामाजिक एकोप्यासाठी पोलिसांची इफ्तार पार्टी

sakal_logo
By

मानखुर्द, ता. २७ (बातमीदार) ः चेंबूरच्या आरसीएफ पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता.२६) इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये परिमंडळ सहामधील ट्रॉम्बे व चेंबूर विभागातील पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. या वेळी पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर आयुक्त संजय दराडे, परिमंडळ सहाचे उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय, ट्रॉम्बे विभागाचे सहायक आयुक्त फिरोज बागवान, चेंबूर विभागाचे सहायक आयुक्त जगदेव कालापाड, तसेच आरसीएफ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळासाहेब घावटे उपस्थित होते.
समाजातील सर्व घटकांमध्ये एकोपा वाढीस लागून शांतता नांदावी, या विचाराने पोलिसांच्या वतीने पोलिस ठाण्याच्या आवारात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजनात ट्रॉम्बे विभागातील तीन, तर चेंबूरमधील दोन पोलिस ठाण्यांनी पुढाकार घेतला होता. यामध्ये दोन्ही विभागांतील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांना सहभागी करण्यात आले होते. पोलिस अधिकाऱ्यांसह परिसरातील सुमारे २०० सर्वधर्मीय नागरिकांनी या इफ्तार पार्टीमध्ये सहभागी होत सामाजिक एकोपा अबाधित ठेवण्याचा निर्धार केला. यावेळी पारंपरिक पद्धतीने अजाण देण्यात आली व त्यानंतर इफ्तारला सुरुवात झाली.

मालाडमध्ये पोलिसांसाठी इफ्तार
मालाड (बातमीदार) ः मालाड पोलिस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी विशेष रोजा इफ्तारचे आयोजन जमातुल मुसलेमीन ट्रस्ट कब्रस्तान मस्जिद मालाड पश्चिमच्या वतीने करण्यात आले. या वेळी मालाड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनंजय लिगाडे, मुंबई काँग्रेस सचिव संतोष चिकणे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या रोजा इफ्तारला मालाड पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी उत्साहाने उपस्थित होते. अशा आयोजनाने एकात्मता, तसेच प्रेम आणि सद्‍भावनेचा महत्त्वाचा संदेश मिळतो, असे मत आयोजक शोएब नेवरेकर आणि साहिल खान यांनी व्यक्त करत मालाड पोलिसांचे आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80164 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top