ओबीसी मोर्चासाठी मिलींद पाटील यांचा सायकल प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओबीसी मोर्चासाठी मिलींद पाटील यांचा सायकल प्रवास
ओबीसी मोर्चासाठी मिलींद पाटील यांचा सायकल प्रवास

ओबीसी मोर्चासाठी मिलींद पाटील यांचा सायकल प्रवास

sakal_logo
By

वाडा, ता.२७ ( बातमीदार) ः ओबीसी समाजाच्या मागण्यांकडे प्रशासन व शासन यांचे लक्ष वेधण्यासाठी उद्या (ता. २९ शुक्रवार) पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चासाठी मिलिंद पाटील हे सायकलवरून प्रवास करून जनजागृती करणार आहेत. वाड्यावरून पालघरला ते सायकलने येतील. त्यानंतर मोर्चात सहभागी होतील.

ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी, ओबीसींचे राजकीय व नोकऱ्यांतील आरक्षण पूर्ववत करावे, इम्पिरियल डाटा उपलब्ध करून द्यावा, महाज्योती संस्थेसाठी भरीव अनुदान उपलब्ध करून द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मिलिंद पाटील यांनी कुणबी समाजगृह गांध्रे येथून प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यांच्या प्रवासाच्या मार्गावर समाजबांधवांनी त्यांचे स्वागत करावे. ज्यांना शक्य त्यांनी या सायकल प्रवासात सहभागी व्हावे, असे आवाहन ओबीसी मोर्चा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80173 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top