घणसोलीमधील उद्यानात अस्वच्छ पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घणसोलीमधील उद्यानात अस्वच्छ पाणी
घणसोलीमधील उद्यानात अस्वच्छ पाणी

घणसोलीमधील उद्यानात अस्वच्छ पाणी

sakal_logo
By

तुर्भे, ता. २७ (बातमीदार) : घणसोली परिसरात विविध उद्याने विकसित केली आहेत. परंतु तिथे पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. यासाठी दोन महिन्यांपूर्वी आधुनिक प्रकारच्या पाणपोईची व्यवस्था करण्याचे निवेदन मनसेकडून घणसोली विभाग कार्यालयाला दिले. त्यानंतर पालिकेकडून जुनाट पाणपोई बसविल्या. यामधून नागरिकांना गरम व अशुद्ध पाणी पिण्यास मिळत होते. यावर मनसे आक्रमक झाली असून शुद्ध व थंड पाणी मिळावे, यासाठी शहर संघटक संदीप गलगुडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
घणसोली नोडल परिसरात सेंट्रल पार्क आणि विविध प्रकारच्या उद्यानांची निर्मिती नवी मुंबई पालिकेने केली आहे. या उद्यानात दररोज नागरिकांची गर्दी असते. तर सेंट्रल पार्कसारख्या आधुनिक पार्कमध्ये तर जत्रा असते. परंतु, सुसज्ज अशा उद्यानांत पाणपोईची सुविधा नसल्याने मनसेकडून १४ मार्चला निवेदन देऊन पाण्याची व्यवस्था करावी, अशी लेखी मागणी केली होती. मनसेकडून मागणी केल्यावर पालिकेकडून कार्यवाही झाली. कुलर बसवण्‍याची मागणी असताना चौथरा बनवला. त्यावर कुलरची व्यवस्था न करता विटा व सिमेंटचे साहित्य वापरून पाण्याची टाकी बनवून नळजोडणी केली. सध्या तापत्या उन्हात नागरिकांना गरम पाणी पिण्यास मिळत आहे. तसेच पाण्याच्या टाकीची स्वच्‍छता नसल्याने अस्वच्छ, गढूळ पाणी मिळत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्नही निर्माण होत असल्याचे मनसेचे म्हणणे आहे.

------
पाणपोईसाठी जो खर्च करण्यात आला आहे, तो केवळ अधिकाऱ्यांच्या हितासाठी आहे. हे पाणी अधिकारी पिणार का? नागरिकांना थंड पाण्याची व्यवस्था पालिकेने करून द्यावी. अन्यथा, मनसे तीव्र आंदोलन उभारेल. त्‍याची जबाबदारी पालिकेची असेल.
- संदीप गलगुडे, शहर संघटक, मनसे, नवी मुंबई

------
मनसेच्या मागणी संदर्भात अभियांत्रिकी विभागाला कळवले जाईल. तसेच योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या जातील.
- महेंद्रसिंग ठोके, सहायक आयुक्त, पालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80175 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top