
आजपासून खर्डीची यात्रा
खर्डी, ता. २७ (बातमीदार) ः खर्डी येथील सोनाई-सिताई देवीची यात्रा गुरुवार (ता. २८) ते मंगळवार (ता.३) दरम्यान साजरी करण्यात येणार आहे. गुरुवारपासून यात्रा (बोहाडा) सुरू होत असून या यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये व यात्रेदरम्यान कायदा-सुव्यवस्था चोख राहावी, यासाठी शहापूरचे पोलिस निरीक्षक राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डीचे पोलिस उपनिरीक्षक रोहिदास केंद्रे यांनी खर्डी येथील पोलिस दूरक्षेत्राच्या आवारात शांतता कमिटी, देवालय ट्रस्ट व मुस्लिम मोहल्ला कमिटीच्या सदस्यांच्या सभेचे आयोजन केले होते.
यात्रेदरम्यान कुठेही आग लागल्यास आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाण्याचे टँकर उपलब्ध ठेवावे, रात्रीच्या वेळी वीज गेल्यावर तत्काळ जनरेटर उपलब्ध असावा, रस्त्यावर सीसी टीव्ही लावावेत, यात्रोत्सव कमिटीची निवड करावी, पिण्याच्या पाण्याची व तात्पुरत्या दवाखान्याची सोय करण्यात यावी, असे आदेश यावेळी खर्डी देवालय ट्रस्टच्या विश्वस्तांना नोटिशीसीद्वारे देण्यात आले असल्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार उपासे यांनी सांगितले.
यावेळी खर्डी देवालय ट्रस्टचे शामबाबा परदेशी, गणेश अधिकारी, विजय बागुल, गजानन पातकर, माजी सरपंच दिलीप अधिकारी, प्रशांत खर्डीकर, सेनेचे गणेश राऊत, राष्ट्रवादीचे शैलेश खर्डीकर, मंगेश दुरगुडे, शाकिर शेख, मलिक शेख व भाजपचे आशपाक अत्तार यांच्यासह अनेक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80178 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..