डोंबिवलीत मिसळ महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डोंबिवलीत मिसळ महोत्सव
डोंबिवलीत मिसळ महोत्सव

डोंबिवलीत मिसळ महोत्सव

sakal_logo
By

डोंबिवली, ता. २७ ः भाऊ चौधरी फाऊंडेशनच्या वतीने मिसळ महोत्सवाचे आयोजन डोंबिवलीत करण्यात आले आहे. डोंबिवलीकर खाद्य प्रेमींसाठी ही एक पर्वणी असून या महोत्सवात कोल्हापूरची चवदार मिसळ, नाद खुळा मिसळ, स्वाद मिसळ, सांगलीची खवा मिसळ, कणकवलीची आचरेकर मिसळ व जुन्नर व कल्याणची मातोश्री मिसळ, देहूची विद्याश्री मिसळ, पारनेरची राजेशाही मिसळची चव चाखायला मिळणार आहे. २९ एप्रिल ते १ मे या कालावधीत सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत सावळाराम क्रीडा संकुल, घारडा सर्कल, डोंबिवली पूर्व येथे हा महोत्सव भरणार आहे. येवल्याची सुप्रसिद्ध पैठणी, हस्तकलेच्या वस्तू देखील या महोत्सवात असणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80198 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top