रात्री बेपत्ता, सकाळी सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रात्री बेपत्ता, सकाळी सुटका
रात्री बेपत्ता, सकाळी सुटका

रात्री बेपत्ता, सकाळी सुटका

sakal_logo
By

घाटकोपर, ता. २७ (बातमीदार) ः घाटकोपर पश्चिमेकडील एका झोपडपट्टीतील रहिवासी असलेली अल्पवयीन मुलगी मंगळवारी (ता. २६) रात्री सुमारास बेपत्ता झाली होती. रात्रभर तिचा शोध सुरू होता. आज (ता. २७) सकाळी तिला पालकांच्या स्वाधीनही करण्यात आले; मात्र घाटकोपर पोलिसांनी तिची कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता अज्ञाताविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे सदर मुलगी बेपत्ता होती, की तिचे अपहरण झाले होते, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
घाटकोपर पश्चिम भागातील एका अल्पवयीन मुलीचे मंगळवारी रात्रीच्या सुमारास बेपत्ता झाली होती. याबाबत तिच्या पालकांनी घाटकोपर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी रात्रभर या मुलीचा शोध घेतला. बुधवारी सकाळी साईनाथनगर लगतच्या नॉर्थ बॉम्बे स्कूल या शाळेजवळ पोलिसांनी या मुलीला पालकांच्या ताब्यात दिले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेविका रितू तावडे यांनी पोलिस ठाणे गाठले. सदर मुलगी रात्रभर बेपत्ता असताना तिची वैद्यकीय तपासणी न करता विनयभंगाचा कसा दाखल झाला, असा सवाल उपस्थित केला. रात्रभर मुलगी बेपत्ता होती. दरम्यानच्या काळात तिच्यावर अत्याचार झाले का, याबाबत पोलिसांकडून गुप्तता पाळण्यात येत आहे. माहिती देण्यासही ते नकार देत असल्याचा आरोप माजी नगरसेविका रितू तावडे यांनी केला.
---
या प्रकरणात अधिक तपास केला जात आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल.
- प्रशांत कदम, पोलिस उपायुक्त, परिमंडळ-७.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80210 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top