लहानग्या जीवांना नवसंजीवनी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लहानग्या जीवांना नवसंजीवनी
लहानग्या जीवांना नवसंजीवनी

लहानग्या जीवांना नवसंजीवनी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ ः बदलत्या जीवनशैलीमुळे ठाण्यात बालकांमध्ये विविध आजार मोठ्या प्रमाणात बळावल्याचे दिसून येत आहे. त्यावर मात करण्यासाठी ठाणे जिल्ह्याचा आरोग्य विभाग सरसावला आहे. ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी स्तरावरील शून्य ते ६ वयोगटातील सर्व बालकांची तपासणी करण्यात आली आहे. यातील ८२ बालकांमध्ये हृदय सदृष्य आजार आढळले असून जिल्हा आरोग्य विभागाकडून त्यांच्यावर यशस्वीरीत्या हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली; तर हर्निया, अपेन्डिक्स आदी आजार असलेल्या २९४ बालकांवरही शस्त्रक्रिया केल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, राष्ट्रीय आरोग्य अभिया, जिल्हा परिषद आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत शून्य ते १८ वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येते. त्यामध्ये विशेषतः जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाडी, खासगी अनुदानित शाळा आणि पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते. त्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाने जिल्ह्यात ३२ पथके नेमली आहेत. या एका पथकात एक पुरुष, एक महिला डॉक्टर, एक परिचारिका आणि औषध वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तीन विविध टप्प्यांत मुलांची तपासणी करण्यात येत असते. त्यानुसार ठाणे जिल्यात एप्रिल २०२१ ते सप्टेंबर २०२१ (फेज २) या कालावधीत तीन हजार ६०७ अंगणवाडींपैकी दोन हजार १८५ अंगणवाड्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ० ते ६ वयोगटातील एक लाख २९ हजार ३०२ बालकांची तपासणी केली गेली. तसेच ऑक्टोबर २०२१ ते मार्च २०२२ दरम्यान तीन हजार २६९ अंगणवाड्यांमधील ० ते ६ वयोगटातील दोन लाख ५७ हजार २२५ मुलांची तपासणी करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80235 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top