उपेंद्र सोनार यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपेंद्र सोनार यांचा सत्कार
उपेंद्र सोनार यांचा सत्कार

उपेंद्र सोनार यांचा सत्कार

sakal_logo
By

खर्डी, ता. २७ (बातमीदार) ः खर्डीतील पाणीपुरवठा योजनेचे वीजबिलाचे गेल्या दोन महिन्यांपूर्वी १५ लाख रुपये थकीत असल्याने महावितरणने या योजनेचे वीज कनेक्शन कट केले होते. वीजबिल भरण्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबई फौंउडेशनचे अध्यक्ष उपेंद्र सोनार यांनी स्वतः पाच लाख रुपये ग्रामपंचायतीला वीजबिल भरण्यासाठी दिले. त्यांच्या या कामाचे कौतुक करत शहापूर भाजप कमिटीच्या वतीने नुकताच त्यांचा शेतकरी मेळाव्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील, कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, नरेंद्र पवार, अशोक ईरनक, तसेच शहापूर तालुका भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80262 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top